राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा तनपुरे आमदार होतील ? ‘या’ कारणामुळे तनपुरे यांच्या विजयाची शक्यता बळावली

Tejas B Shelar
Published:
Rahuri Vidhansabha Nivdnuk 2024

Rahuri Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. येत्या काही दिवसांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र अजून या दोन्ही गटांचे जागावाटप फायनल झालेले नाही. पण लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांची नावे देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार देणार असे बोलले जात आहे. यामुळे येथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून इतर कोणीही इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे महायुतीकडून येथून कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र असे असले तरी ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाटेला येईल आणि येथून शिवाजी कर्डिले हे उभे राहतील असे बोलले जात आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुद्धा सुरू केली आहे.

त्यामुळे 2019 च्या निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूकही राहुरीत दुरंगी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यात यावेळी लढत होणार असे सध्याचे चित्र.

राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा तनपुरे आमदार होतील ? ‘या’ कारणामुळे तनपुरे यांच्या विजयाची शक्यता बळावली

खरे तर 2019 च्या निवडणुकीत पडद्याआड काही घडामोडी घडल्या होत्या. त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार कर्डिले यांना बसला होता. गेल्या वेळी येथून दुरंगी लढत झाली होती. यंदाही येथून दुरंगीचं लढत होणार असे दिसते.

गेल्या निवडणुकीत येथे मतविभागणी झाली नव्हती. म्हणून याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांना मिळाला. तनपुरे गेल्यावेळी आमदार झालेत अन पंधरा वर्षांनंतर त्यांना त्यांचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेता आला. एवढेच नाही तर तनपुरे यांना विजयानंतर महाविकास आघाडीत मंत्रीपद सुद्धा मिळाले.

त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा त्यांना मतदारसंघात फायदा झाला. महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या जोरावर मतदार संघातील अनेक प्रकल्प मार्गी लागलेत. त्यांच्याकडे पाच वर्षे मंत्रीपद राहील असे वाटत असतानाच अचानक मंत्रीपद गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटात न जाता शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान यावेळी तनपुरे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास फिक्स झालेले आहे. ते आता निवडणूकीत निळवंडे, वांबोरी चारीसह अन्य विकासकामांच्या आधारावर जनतेसमोर जाणार आहेत. त्यांनी मंत्री असताना मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर तनपुरे हे पुन्हा एकदा येथून विजयी होऊ शकतात असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe