Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांनी रामनवमी साजरा करण्याचे आदेश दिले आणि स्वतः परदेशात पळाले’

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला रामनवमी जोरात साजरी करण्याचे आदेश दिले होते. असे असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. राम नवमी जोरात साजरा करण्याचे आदेश देणारे, स्वत: मात्र यात सहभागी नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तथाकथित हिंदुजननायक परदेश दौऱ्यावर पळून गेले आहेत. यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. यालाच म्हंटले जाते की, हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, अशी टीका मिटकरींनी राज ठाकरेंवर केला आहे.

यावर आता मनसे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी, असे आवाहन केले होते. तसेच ६ जून रोजी शिवछत्रपती राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत.

मी रायगडावर जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सर्व हिंदू बांधवांनी दक्ष राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे. असे म्हटले आहे. असे असताना मात्र आमदार मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत भव्य उत्सवसोहळा आहे. काही ठिकाणी गोंधळ देखील झाल्याचे बघायला मिळाले.