राजकारण

Rajan Salvi : चालू पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा आमदार, कारणही आहे तसेच…

Published by
Ahmednagarlive24 Office

Rajan Salvi : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या आमदारांवर अनेक प्रकारच्या चौकशा लावण्यात आल्या आहेत. असे असताना ठाकरे गटात राहणारे राजन साळवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजन साळवी सध्या एसीबीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामुळे ते अडचणीत आहेत.

नुकतेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सुध्दा चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता रामपूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने नोटिस दिले आहे. यामुळे त्यांची संपत्ती मोजली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांच्या घराचे मूल्यांकन करत आहे. हे पाहून माध्यमांशी बोलताना राजन साळवी यांच्या भावना अनावर झाल्या. ते पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले.

यावेळी ते म्हणाले, एसीबीकडून माझ्या मालमत्तेची कसुन चौकशी केली जात आहे. या चौकशीत मी अधिकार्‍यांना सगळी माहिती दिली आहे. तरी त्यांच समाधान झालं नाही. सतत मला बोलावले जात आहे. माझ्या वडिलोपार्जित घराची त्यांनी मोजमाप केले. यामुळे वाईट वाटले.

माझ्या कष्टाच्या घराला आज टेप लावला, याचे दुःख आहे. मी हे घर हाॅटेल व्यवसायाच्या माध्यमातून उभा केल आहे. माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कमवलं आहे ते स्वतःच्या कष्टातून उभ केल आहे. हा चौकशीचा फेरा येणार्‍या काळात लवकरच नाहीसा होईल, असेही ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office