Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का आहे? याबाबत गुजरातमधील नागरीक राज ठाकरे यांना साद घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत माहिती अशी की, गुजरातमधील लोक एका तलावावर मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत राज ठाकरे यांच्याकडे मागणी करत आहेत. राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रातील अतिक्रमणाचा विषय काढला आणि ते तोडण्यात आले. यामुळे अशीच कारवाई त्याठिकाणी देखील करण्यात यावी असे म्हटले जात आहे.

तिथल्या लोकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राज ठाकरे यांनी सभेत माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.

असे असताना दुसऱ्या दिवशीच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे.

तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यामुळे राज ठाकरे फोकसला आले. यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.