Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे आता राजू शेट्टी कोणासोबत युती करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजू शेट्टी म्हणाले,
आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो होतो. भाजपपासून तर यापूर्वीच बाहेर झालो आहोतच. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचा सातत्याने संघर्ष सुरू आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी हातकणंगले जागेव्यतिरक्त इतर चार ते पाच लोकसभेच्या कोणत्या असणार आणि कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र पाच जागा कोणत्या लढवायच्या याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे, शेट्टी यांनी सांगितले.
आमची रस्त्यावरची लढाई अजूनही संपलली नाही. केंद्र सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार लोकशाहीविरोधात चालू आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
आता या पाच जागा कोणत्या असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजू शेट्टी हे ऊस आंदोलन, दूध आंदोलन करत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून शेतीचे अर्थकारण त्यांना समजत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.