राजकारण

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच ठरलं! या मतदार संघातून लोकसभा लढवणार..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास आठवले हे पराभूत झाले होते.

असे असताना त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे.

तसेच भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असेही आठवले म्हणाले. यामुळे आता प्रत्यक्षात 2024 मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार आहे. यामुळे काय निर्णय होणार हे लवकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office