आमदार निलेश लंकेना हरवण्यासाठी रोहित पवार मैदानात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण दक्षिण आणि उत्तर मध्ये विभागल आहे. सध्या दक्षिणेतील राजकारण नेहमीच चर्चेत येतय. सध्या पारनेर व ओघानेच आ.लंके यांचं राजकीय अस्तित्व कस असणार यावर चर्चा सुरू आहे. याच कारण बदलत राजकीय समीकरण. त्यातच आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात.

आ.रोहित पवारांची राजकीय गुगली :- सध्या शरद पवार गटाची धुरा वाहणारे आमदार रोहित पवार यांनी आमदार नीलेश लंके यांच्या पारनेरमध्ये महिलांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील महिलांना एकत्र करण्याचे काम पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी अर्थात आ.निलेश लंके यांचे सध्याचे कट्टर राजकीय वैरी यांकडे होते. त्यामुळं सर्वांनीच तोंडात बोटे घातली असून पवारांनी मोठी राजकीय गुगली टाकली असल्याच बोललं जातं आहे.

औटी यांचं लॉंचिंग अन मोठ्या पवारांची भविष्यातील खेळी :- अजित पवार हे राष्ट्रवादीत बंड करून भाजप सोबत गेले. आमदार नीलेश लंके हे देखील शरद पवार गटाची साथ सोडत अजित दादांसोबत गेले. आ.लंके यांची लोकप्रियता पाहता मोठ्या पवार साहेबांनी किंवा आ. रोहित पवार यांनीही त्यांना थेट विरोध केला नाही. पण विजय औटी यांची वाढती क्रेझ पाहता आता लंके यांना शह देण्यासाठी आ. रोहित पवार यांनी विजय औटी याना लॉन्च करण्याची खेळी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

आ. लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष :- आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका पाहता शरद पवार गट पारनेर साठी व दक्षिण लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार शोधत आहे. पण सध्या आमदार नीलेश लंके हे कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे. कारण मध्यंतरी त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तर शरद पवार गटसोबत असल्याचा दावा केला होता. तर लंके यांनी अजित पवार देतील तो आदेश मान्य करून, लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केलेल होत. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेकड सध्या लक्ष लागून आहे.

विधानसभेसाठी विजय औटी निश्चित ? :- आ.रोहित पवारांनी आज पारनेरमध्ये भाऊबीजेनिमित्त महिलांचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन नीलेश लंके यांच्यापासून दुरावलेले विजय औटी यांच्याकडे दिले. हे त्यांचे लॉंचिंग असल्याची चर्चा आहे. विजय औटी हे येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.