राजकारण

रोहितदादा कर्जत-जामखेडमधून परत निवडून या, मगच मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics : राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एकजण भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत.

दहीहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याचकार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर बालगोपाळ आणि कार्यकर्त्यांसह आमदार रोहित पवार थिरकल्याचे दिसून आले.

दहिहंडी स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले. कर्जत-जामखेडमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही आमदार रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जतमध्ये १ सप्टेंबरला दादा पाटील महाविद्यालयात तर जामखेडमध्ये २ सप्टेंबरला नागेश विद्यालयात दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी अनेकांनी आमदार रोहित पवार भावी मुख्यमंत्रीअसे लिहिलेले बॅनर झळकावले. त्यांच्या या बॅनरबाजीची मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले. तसेच मै हू डॉनच्या तालावर रोहित पवार बाळगोपाळ व कार्यकत्यांसमवेत मनसोक्त थिरकले.

कर्जत-जामखेडमधून परत निवडून या, मग स्वप्न पहा
दहिहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री रोहित पवार असे बॅनर झळकले. मै हूँ डॉन या गाण्यावर आमदार रोहित पवार स्वतः थिरकले होते. यावर प्रा. मधुकर राळेभात यांनी टीका केली. ते म्हणाले, १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले.

आता पक्ष फुटला तरी या पक्षासाठी निष्ठेने योगदान देणाऱ्यांना सोडून अवघ्या ५ वर्षांपूर्वी अपघाताने आमदार झालेल्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. आधी त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून परत निवडून यावे व मग स्वप्न पहावे, असा टोला प्रा. राळेभात यांनी लगावला.

अहमदनगर लाईव्ह 24