Sameer Wankhede : ब्रेकिंग! समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? हा मतदार संघही निवडल्याची चर्चा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sameer Wankhede : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतीच नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

तसेच दोघांनीही केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यामुळे समीर वानखेडे आता भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

वाशीम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वानखेडे हे वाशीम जिल्ह्यातून निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकतात. वाशिम हा मतदार संघ भाजपचाही बालेकिल्ला आहे. त्यामुळे समीर वानखेडे या वाशिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

क्रांती रेडकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी क्रुझवर झालेल्या पार्टीत वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती.

त्यावेळी त्यांची बरीच चर्चा झाली होती. तसेच वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात अनेक धाडी टाकून आपला दरारा निर्माण केला होता. यामुळे आर्यन खान काही महिने तुरुंगात होता. त्यानंतर मात्र वानखेडे अडचणीत आले होते. आर्यन खानला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

वानखेडेंनी नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही समोर आले. यामुळे वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. आता ते भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा समोर येत आहेत.