Sanjay Raut : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षविरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्षविरोधी पावले उचलणे असा ठपका ठेवत राऊतांविरोधात ही कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राऊत हे रोज अनेक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत.
सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आम्हाला आता खरी शिवसेना म्हणा असेही शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. शिवसेना पक्षाचे सर्व अधिकारही एकनाथ शिंदे यांच्याकडेच देण्यात आले. यामुळे संजय राऊत यांची आता हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, त्रिसदस्यीय समिती संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत सध्या अनेक प्रकारे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काही दिवसांपासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील बोलत आहेत. यामुळे सध्या ते अडचणीत आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.