Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी पत्र लिहूनही कसबापेठ, चिंचवडची पोटनिवडणूक होणारच- संजय राऊत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Raut : राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे.

यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी देखील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार आहे.

तसेच ते म्हणाले, चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असूनआम्ही मविआ म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत. यामुळे येणाऱ्या काळात या निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होत तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो.

तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवारांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता येणाऱ्या दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणूकीआधी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.