राजकारण

Sanjay Raut : श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

यामध्ये श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. या सत्तांतरानंतर माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

या पत्रात माझ्या जीवितास धोका असल्याची भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात मी सुरक्षा मागितली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही लाचार नाही, सुरक्षा नाही दिली तरी चालेल, असेही ते म्हणाले.

तसेच मी एकटा वाघ आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे.

सध्या शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. यामुळे ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक उडत आहे. यामुळे रोज आरोप केले जात आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Ahmednagarlive24 Office