ShahajiBapu Patil : सध्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप टीका सुरू आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचे आडनाव बदलून संजय आगलावे असं ठेवायला हवं. कारण ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. रोज सकाळी सकाळी ते उठतात आणि महाराष्ट्रभर आग लावण्याचे काम ते करतात, असे पाटील यांनी म्हटले आहे.
राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील याचा काही नेम नाही. संजय राऊत हे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत असेही मला कधीही वाटलं नाही, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. यामुळे आता ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यानंतर राऊत देखील आक्रमक झाले आहे. ते म्हणाले, शहाजीबापू पाटील यांनीही शहाजी नाव बदलले पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय, असे राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत रोज शिंदे गटावर टीका करत आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये रोज भर पडत आहे. यामध्ये संजय राऊत रोज अग्रेसर असतात.