शेवगाव : मागील सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले.माझ्या सारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली.भारताच्या राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविद व मा.द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपती केले आहे. तर लंडन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव असलेले घर ताब्यात घेतले. ३७० सारखे कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेशात जाऊन, सर्व आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगत असून संविधानाचा निळा रंग बदलून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत.त्यांच्यापासून संविधानाला खरा धोका असून ते काय संविधाचे रक्षण करणार. देशात भाजपाचे भक्कम सरकार आहे राज्यात तेच सरकार निवडुन दया म्हणजे विकासाची गंगा जनतेपर्यंत येईल असे मत आवाहन परीषदेचे आमदार अमित गोरखे यांनी बोधेगाव येथे महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेमध्ये केले.
तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी, आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल, विवेक मिसाळ, चंद्रकांत काळोखे, दादाराव भोसले, बापूसाहेब भोसले, सुभाषराव बर्डे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, बाबा राजगुरु, अनिल वडागळे, भगवान साठे, मिनाताई कळकुंभे, सुरेश भागवत, रवी आरोळे, अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, दिलीप विखे, शरद चाबुकस्वार, नवनाथ भवार, भाऊसाहेब पाटील, अशोक ससाणे,
अशोक खिळे, संजय खेडकर, सचिन बारस्कर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन वारकड, संदीप देशमुख, विक्रम बारवकर, सुगंध खंडागळे, लहूराव भवर, अंबादास ढाकणे, महेश घोरतळे, सुनील राजपुत, सचिन भारस्कर, कुद्दुस पठान, राजेंद्र डमाले, विक्रम देशमुख, प्रा.भाऊसाहेब मुरकुटे, यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे पुढे बोलताना म्हणाले, मोदी सरकारच्या काळामध्ये ३७० सारखे कलम हटवुन तिथे अनुसुचित जाती जमातींना प्रतिनिधीत्व दिले आहे, आण्णाभाऊ साठे यांचे भारतातच नाही तर रशियामध्ये जाऊन स्टॅचु उभारण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, अण्णाभाऊ साठे व लुहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे अशी सर्व मातंग समाजाची मागणी होती आज पुण्यामध्ये ५ एकर जमिन देवुन त्याठिकाणी स्मारकाचे काम झाले आहे, डॉ.बाबासाहेब अंबेडकरांचे लंडन मधील घर मिळविण्याचे व दिक्षा भुमि व चैत्यभुमी ला निधीची मोठी तरतुद करण्याचे काम भारतीय जनता पार्टी महायुतीच्या काळात झाले आहे अशा गोष्टी कॉग्रेस सरकारला कधी सुचल्यादेखील नाहीत, अण्णाभाऊ साठे रिसर्च (आर्टी)संस्थेच्या माध्यमातुन हजारो मागासवर्गीय तरुण आज लाल दिव्यांच्या गाडयामधुन फिरतांन दिसत आहेत.
रमाई योजनेच्या माध्यमातुन लाखो कुटुंबांना चांगली घरे देण्याचे काम झाले आहे.भाजपा सरकारने कुठलाही दुजाभाव केलेला नाही या योजनेत राज्यात सर्वात जास्त १ लाख ३० हजार महिलांना शेवगाव पाथर्डी मतदार संघात आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातुन लाभ मिळालेला आहे तर उलट लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात जाणा-या काँग्रेस सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा सुरु केली आहे मग डॉ.आंबेडकर यांच्या विचाराचा वारसाजपणा-या समाजाने आतातरी कॉग्रेस सरकारला ओळखले पाहिजे नाहीतर पुन्हा आपल्याना लोकांच्या दारामध्ये जावे लागेल त्यासाठी महायुतीला साथ दया.
जनतेची काळजी घेणाऱ्या आमदार राजळे हॅटट्रिक करणार आहेत. बोधेगाव येथे असलेल्या आणाभाऊ साठे यांच्या कारण इथे आल्यावर अनेकांशी बोललो, चर्चा केली तेव्हा समजले की, राजळे यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन, मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीमागे ठाम उभा असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
बोधेगाव येथे असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या हस्तीं आहेत त्याठिकाण मी व आमदार मोनिका राजळे यांचया सहकार्यातुन मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल भव्य स्मारक उभारण्याचे काम आम्ही यापुढील काळात करणार आहेत तरी सर्व अनुसुचित जाती जमातीतील समाज बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जिवंत ठेवण्यासाठी महायुती सोबत राहण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले
आमदार मोनिका राजळे यांनी बोलतांना, दहा वर्षात राजकीय, सामाजिक प्रवासात प्रत्येक गावाला काही ना काही दिले. सर्व जातीपातीचे लोक विकासाच्या प्रवाहात आले तर तालुक्याला न्याय देता येतो. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची लोकप्रतिनिधी जबाबदारी असते, त्याच भावनेतून आजवर काम करत आहे म्हणुनच रस्ते,विज आणि पाण्याचा प्रश्न आज मार्गी लागले आहेत
यापुढील काळात उदयोग धंदयांच्या माध्यमातुन रोजगार निर्माण करावयाचा आहे विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीला मतदान करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम केसभट, तर सूत्रसंचलन सोमेश्वर शेळके यांनी केले. यावेळी आमदार गोरखे यांच्या उपस्थितीत परिसरातील अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.