शेवगाव- राजसत्तेला धार्मिक अधिष्ठाण असल्याशिवाय जनतेचे कल्याण होत
नाही. संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य आहे.
राजकारणाला सामाजिक बांधिलकीचे पदर जोडले की समाजाच्या उद्धाराचा मार्ग
सुकर होतो.
समाजाची सेवा ही देखील ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सोपा करण्याची प्रक्रीया असते. जनसेवा हा धर्म पाळण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि राजळे कुंटुंब करीत असते. मोनिकाताई राजळेंना यांना विजयी करुन त्यांना समाजाजाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन युवा नेते कृष्णा राजीव राजळे यांनी केले.
वरुर धाकटी पंढरी येथे विठ्ठल रुखमीनी मंदीरासमोर नारळ वाढवुन राजळे यांचा प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ साधु दिनकर महाराज आंचवले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नागरीकांशी सवांद साधताना राजदळे बोलत होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते दिनेशराव लव्हाट म्हणाले, भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघात प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत. शांत ,संयमी व विकासाचा दृष्टीकोन असलेल्या राजळे नेत्या आहेत. पक्षाने त्यांना तिस-यांदा संधी दिली आहे.
आता राजळे यांना निवडुण आणुन त्यांना नामदार करण्यासाठी युवकांनी काम करावे. लाडक्या बहीणींची साथ आहेच. युवक व नागरीकांनी आपणच उमेदवार अहोत असे समजुन काम करावे.
यावेळी भानुदास सोनटक्के, गणेश म्हस्के, शुभम गाडे, प्रसाद आव्हाड, दादासाहेब
घुले, ज्ञानेश्वर म्हस्के, ज्ञानेश्वर खांबट, अमोल रेवडकर, भाऊसाहेब
वावरे, प्रकाश म्हस्के, केशवआबा म्हस्के, संतोष रेवडकर, गोटीराम ढाळे
उपस्थीत होते. गणेश म्हस्के यांनी सुंत्रसंचालन केले. वैभव वावरे यांनी
आभार मानले.