Shevgaon Vidhansabha : अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी यंदा बहुरंगी लढत होणार आहे. शेवगाव विधानसभा मतदार संघात छाननीनंतर 27 जणांचे अर्ज राहिले होते.
यापैकी 12 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्थातच या जागेसाठी आता 15 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. खरे तर, महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून आहे. यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार असून त्यातल्या त्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक काटेदार होणार अशी शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका रांजळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे उमेदवार एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांना संधी मिळाली आहे.
तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले, जनशक्ती आघाडीच्या हर्षदा काकडे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. घुले आणि काकडे हे ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेणार की आपला अर्ज कायम ठेवणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते.
मात्र घुले आणि काकडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे शेवगाव विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी राहणार आहे. या बहुरंगी निवडणुकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष राहणार आहे.
कोणत्या प्रमुख नेत्यांमध्ये होणार बहुरंगी लढत
या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अॅड. प्रताप ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले,
माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, रासपचे आत्माराम कुंडकर, बसपचे सुभाष त्रिंबक साबळे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे आता शेवगाव विधानसभा मतदारसंघाचा गड कोण काबीज करणार, विद्यमान आमदार राजळे पुन्हा एकदा आपला गड शाबूत ठेवण्यात यशस्वी होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.