राजकारण

रोहित पवारांचा पराभव फिक्स ! शिंदे-राळेभात झाले एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics News : आमदार प्रा. राम शिंदे यांनी मला भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आजची बैठक झाली. वा बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मी पक्ष सोडताना निर्णय घेतला होता की मी यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही. मला तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवार यांच्या विरोधातील उमेदवाराला मदत करणार आहे.

त्यासाठी आम्ही एकत्र येणार आहे. पण एकत्र येण्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात बांनी सांगितले. आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाहीला कंटाळून जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात बांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.

राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे पुढील राजकीय भूमिका कधी जाहीर करणार याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागलेले असतानाच सोमवारी (दि. २) रत्नापूरचे माजी सरपंच दादासाहेब वारे यांच्या निवासस्थानी राळेभात व आमदार प्रा. राम शिंद यांची बैठक पार पडली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपात येण्याचे खुले निमंत्रण

दरम्यान २७ ऑगस्ट रोजी आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामन्ब्रेड तालुक्याचे जेष्ठ नेते राळेभात यांनी कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी भाजपात यावे, त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका घेतली होती. राम शिंदे यांनी राळेभात वांना भाजपात येण्याचे खुले निमंत्रण दिल्यानंतर प्रा. मधुकर राळेभात हे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

दोन तास बंद दाराआड चर्चा

अखेर आठ दिवसानंतर प्रा. राळेभात यांनी आमदार शिंदे यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने आ. शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. सुमारे दोन तास बंद दाराआड दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.  यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक डॉ. गणेश जगताप, चेअरमन अशोक महारनवर, सुहास बारे, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार, खर्ड्याचे ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे आदी उपस्थित होते.

लवकरच ते भाजपात येतील, अशी आशा – प्रा. राम शिंदे
या बैठकीनंतर बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात बांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलं निमंत्रण दिले होते. त्यानुसार आमची बैठक झाली. कर्जत-जामखेडचा विकास करायचा असेल तर जेष्ठ अनुभवी नेते सुध्दा आपल्या सोबत असायला हवेत, अशी माझी भावना आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती आमची चर्चा झाली. पण ही चर्चा अजून पूर्णत्वाकडे गेलेली नाही. लवकरच ते भाजपात येतील, अशी आशा आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.
– आमदार. प्रा. राम शिंदे,

पवार यांच्याविरोधातील उमेदवाराला निवडून आणेन – प्रा. मधुकर राळेभात
गेल्या दहा वर्षापूर्वी मी स्वतः आमदार राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. आम्ही दोघे एकमेकांचे विरोधक होतो. विरोधक असतानाही त्यांनी मला भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आजची बैठक पार पडली. पुढच्या इलेक्शनला कसे सामोरं जायचं, काय करायचं ? अश्या बऱ्याचश्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा झाली. आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकत्र कसे यायचं यावर निर्णय झालेला नाही. लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ. मला तिकीट मिळाले तर रोहित पवारांच्या विरोधात लढेन, नाहीतर पवार यांच्याविरोधातील उमेदवाराला निवडून आणेन, एव्हढे मात्र नक्की.
– प्रा. मधुकर राळेभात, ज्येष्ठ नेते, जामखेड

अहमदनगर लाईव्ह 24