Maharashtra News : राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला विश्वासात घेऊन टिकणारे आरक्षण दिले आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अनेक समाज हिताचे निर्णय झाले असून
त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी दिला तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, स्वायत्त सारथी संस्था, एमपीएससी व यूपीएससीची वयोमर्यादा वाढीचा प्रस्ताव तसेच शिवस्मारकाची न्यायालयीन लढाई असे अनेक निर्णय भाजप सरकारने घेतले असून स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी देखील
शेवटपर्यंत युतीधर्म पाळत भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे यापुढे देखील स्व. विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून जय शिवसंग्रामचे कार्य अविरत चालूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील जय शिवसंग्राम पक्षाचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी केले.
नुकतेच महाराष्ट्रातील जय शिवसंग्रामचे पदाधिकारी यांनी नाशिक येथे ३० रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जय शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष रामहरी भैया मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाला बिनशर्त जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी शेवागव येथे झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत जय शिवसंग्राम पक्षाचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष नवनाथराव इसरवाडे हे बोलत हे होते. यावेळी जय शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष रामहरी भैया मेटे,
जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील, प्रदेश सरचिटणीस दीपक कदम, जय शिवसंग्राम पक्षाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांच्यासह जय शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.