राजकारण

शिवसेनेच्या दिवाळीफराळास भाजपचा आमदार ! पुन्हा विखेंविरोधातच एल्गार, आ.राम शिंदे शिवसेनेची मदत घेणार? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्ष एकत्र येताना दिसतायेत व सर्व जण फक्त विखे यांनाच टार्गेट करताना दिसतायेत. यंदाचे दिवाळी फराळ राजकीय फटाक्यांनी गाजले.

या दिवाळी फराळाकडे सहसा कुणी पाहत देखील नाही. परंतु या वर्षी मात्र या दिवाळी फराळाकडे सर्व्ह अहमदनगरकरांच्या नजरा आहेत. याचे कारण म्हणजे यातून आगामी लोकसभेचे आखाडे बांधले जात आहेत.

* आ. राम शिंदे लक्षवेधी

नगर दक्षिणेत सध्या भाजपचे आ. राम शिंदे लक्षवेढी ठरत आहेत. ते भाजप आमदार असले तरी सध्या भाजप सोडून सर्वच पक्षांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावत आहेत. नुकतेच ते राष्ट्रवादीचे आ. लंके यांच्या दिवाळी फराळाला गेले होते.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख शशशिकांत गाडे सरांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी येथून देखील विखे यांनाच टार्गेट केले.

* गाडे सरांच्या दिवाळी फराळात देखील विखेच टार्गेट

दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात आ. शिंदे यांनी पुन्हा एकदा विखे यांनाच टार्गेट केले. ते म्हणाले, नगर दक्षिणेचा खासदार हा आपल्या भागातीलच पाहिजे. विशेष म्हणजे हा असा संदेश सर्वांपर्यंत गेलेला देखील आहे अशी मिश्किल राजकीय टिप्पणी देखील केली.

नगर दक्षिणेचा खासदार हा दक्षिण भागातीलच असला पाहिजे. पक्ष वेगळा असला, तरी आपले ऋणानुबंध सर्वांबरोबर चांगले आहेत असेही शिंदे म्हणाले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष माजी आमदार विजय औटी, आमदार नीलेश लंके, राजेंद्र नागवडे,

घनश्याम शेलार, भगवान फुलसौंदर, साजन पाचपुते, अभिषेक कळमकर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, संदेश कार्ले, प्रताप पाटील शेळके आदी उपस्थित होते. लंके यांच्या कार्यक्रमात देखील त्यांनी असाच एल्गार केला होता.

Ahmednagarlive24 Office