राजकारण

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे वातावरण एकतर्फी झालंय ? विक्रम पाचपुते यांना मिळतोय उदंड प्रतिसाद !

Published by
Tejas B Shelar

Shrigonda News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, सध्या स्थितीला विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे पाचपुते कुटुंबाकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून यंदाही मतदारसंघाला बबनदादा पाचपुते यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा एक युवा आमदार लाभणार असा दावा केला जातोय.

विक्रम पाचपुते यांच्या जमेच्या बाजू

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. या मतदारसंघात पाचपुते कुटुंबाचा फार मोठा जनसंपर्क आहे, ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. श्रीगोंदा म्हणजे बबनदादा पाचपुते आणि बबनराव पाचपुते म्हणजे श्रीगोंदा असे या मतदारसंघाचे समीकरण. बबनदादा आपल्या कार्यकाळात विविध पक्षांकडून निवडणुकीत उभे राहिलेत आणि त्यांनी विजय संपादित केला.

म्हणजेच येथे पक्षापेक्षा नेत्याला अधिक महत्त्व असून पाचपुते यांचा जनसंपर्क किती मोठा आहे हेच यातून लक्षात येते. काम करणारा नेता म्हणून पाचपुते यांच्याकडे पाहिले जाते. पाचपुते यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून आणला.

मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पाचपुते कुटुंब नेहमीच तत्पर असते. पाचपुते आपला कॉल रिकॉर्डिंग चेक करा मग कळेल की आम्ही मतदार संघासाठी काय केले आहे असा दावा करतात. यावेळी मतदार संघाची लढत ही बहुरंगी झाली आहे मात्र असे असले तरी आमचे कार्यकर्ते कुठेच शिफ्ट होणार नाहीत असे पाचपुते यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या सभेला माणसं भेटत नाहीत!

युवा नेते विक्रम दादा पाचपुते अन समर्थकांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित उद्धव ठाकरे यांच्या सभेतून माणसं उठून गेली होती, त्यांनी पैसे देऊन माणसं आणण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही त्यांच्या सभेला गर्दी जमली नाही. यामुळे विरोधकांना यश मिळणार नाही असा दावा केला जातोय.

विक्रम पाचपुते यांचे पारडे जड

सध्या मतदारसंघात दोन्ही गटांकडून अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी कडून विजयाचा दावा केला जात आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांचे पारडे जड दिसते. मतदारसंघात केलेली विकास कामे, सर्वसामान्यांसाठी नेहमी तत्पर, कोणाच्याही मदतीला धावून जाणारा नेता या सर्व बाबींमुळे पाचपुते यांचे पारडे जड दिसते.

मतदारसंघात सतत संपर्कात असणारा नेता म्हणून विक्रम दादा पाचपुते यांची ओळख आहे. आतापर्यंत मतदार संघात सर्वात जास्त निधी पाचपुते यांनीच आणला आहे. पुढेही मतदारसंघासाठी मोठा भरीव निधी आणला जाईल असा दावा पाचपुते यांच्याकडून केला जातोय.

ते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. युवा नेता, उत्तम वक्ता, व्हिजनरी नेता म्हणून विक्रम पाचपुते यांच्याकडे पाहिले जात असून याच साऱ्या कारणांमुळे पाचपुते कुटुंबांकडून आणि समर्थकांकडून त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी पाचपुते यांना मुस्लिम समाजाचा देखील पाठिंबा मिळत असून धनगर समाजानेही पाचपुते यांना पसंती दाखवली आहे.

नागवडे कुटुंबाच्या अत्याचारामुळे धनगर समाज आज पाचपुते यांच्या पाठीशी ठामपणे उभा दिसतोय. नागवडे कुटुंबाने कारखान्याची खोटी बिले मुलाच्या नावाने दिलीत, यामुळे मतदारसंघात नागवडे कुटुंबाविरोधात संताप व्यक्त होतोय, अन म्हणूनचं पाचपुते हे यंदाच्या निवडणुकीत सहज विजय मिळवणार असे समर्थकांचे म्हणणे आहे.

पाचपुते यांच्या बाजूचे मुद्दे !

सातत्याने सर्वसामान्य मतदारांच्या संपर्कात असणे, मतदारसंघातील मोठा जनसंपर्क, विजनरी नेता आणि विकासाचा चेहरा
मतदारसंघात पाचपुते कुटुंबाचे स्वतःचे हक्काचे केडर आहे. याचा फायदा पाचपुते कुटुंबाला नक्कीच होणार आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावली आहेत, मोठमोठी विकास कामे केली आहेत. आता त्यांचाच विचाराचा वारसा विक्रम पाचपुते हे पुढे घेऊन जात आहेत.
पाचपुते यांनी प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत यामुळे गावागावांमध्ये पाचपुते यांचे केडर तयार झाले आहे. अन ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू बाजू आहे.
पाचपुते विकासाचा चेहरा म्हणून अन युवा नेता म्हणून मतदारांची पहिली पसंती असल्याचा दावा समर्थक करत आहेत.
पाचपुते यांच्या पाठपुराव्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मतदार संघातील अनेक महिलांना लाभ मिळाला असून यामुळे आता या महिलावर्ग पाचपुते यांना पाठिंबा देणार असे म्हटले जात आहे.
वंचित, दलित, माळी, मुस्लिम तसेच धनगर समाजाचा पाचपुते यांना पाठिंबा आहे.
बबनदादा तसेच पाचपुते परिवाराचा आणि मतदार संघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बेस हा मजबूत आहे.

सर्वसामान्य जनतेनेच पाचपुतेंना पैसे दिलेत

विक्रम दादा पाचपुते हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते विजयी झालेत तर तालुक्याला एक युवा नेता, एक व्हिजनरी नेता लाभणार आहे. म्हणून मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने विक्रम दादा यांना मदत केली आहे. अनेक गावातील सामान्य कार्यकर्त्यांनी, सैनिक, शेतकरी आणि महिला वर्गाने आपल्या कष्टाचे पैसे विकी दादांना निवडणुकीसाठी देऊ केले आहेत. या सर्व गोष्टी पाहता सध्या पाचपुते कुटुंबाची मतदारसंघात हवा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे 23 तारखेला आमचाच गुलाल पडणार असे म्हणतं कार्यकर्ते आत्तापासूनच विजयानंतरच्या तयारीला लागले आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com