Ahmednagar Politics : कुणी साखर वाटो किंवा डाळ, जनता आमच्याच सोबत ! लोकसभेसाठी विखेंविरोधात राणी लंके यांचा एल्गार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरचे लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात नगर दक्षिणेची जागा आता बरीच प्रतिष्ठेची होईल यात शंका राहिली नाही. कारण आता विखे यांच्या विरोधात लंके हेच उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. हेच वातावरण तयार करण्यासाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी

शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे बोलले जात आहे. याला मिळणार प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. राहुरीतही त्याचन्हे जंगी स्वागत करण्यात आले.

जनता आमच्या सोबत

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कुणी साखर वाटो किंवा डाळ वाटो सर्व सामान्य जनता आमच्या सोबत आहे असा एल्गार राणी निलेश लंके यांनी केला. राहुरी तालुक्यातील शिवस्वराज्य यात्रे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभेला उभे राहण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला.

आज शुक्रवारी सकाळी राहुरी शहरातील नगर- मनमाड रोडवर मल्हारवाडी चौकात शिवस्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राणीताई लंके यांच्यावर जेसीबीच्या साह्याने कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी बोलताना राणीताई लंके म्हणाल्या की, आम्ही आमच्या कामाच्या जोरावर लोकांच्या अडीअडचणींतील कामे सोडवून लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आम्ही येणारी लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहि.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितिचे संचालक रामदास बाचकर यांनी केले. तर सूत्रसंचालन अॅड. राहुल झावरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी संदस्य धनराज गाढे, मंगेश गाढे, संदिप आढाव,नगरसेवक भाऊसाहेब चौरे,

अमोल बेल्हेकर, दलित चळवळीचे बाळासाहेब जाधव, सुनिल कोकरे,दत्तात्रय खताळ,राजू मकासरे, राहुल तमनर, हरिदास जाधव,नितीन भांबळ, आर.आर.राजदेव, गणेश आहेर, प्रवीण वारुळे, बाळासाहेब काळे, दत्तात्रय फुंडे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe