२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती.निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा गुलाल उधळला गेला.आता ही हिरवी वळवळ जर थांबवायची असेल तर आपणास एकत्र यावे लागेल धर्माच्या माध्यमातून एक राहावे लागेल म्हणून विधानसभेत भगवा ध्वजाच्या खाली आपण सर्व एकत्र आलो व विजय संपादन केला.असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सारसनगर परिसराच्या वतीने आ. जगताप यांचा भगवानबाबा मंदिर येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब मुंडे, भीमराव महाराज दराडे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, झुंबरराव आव्हाड, भीमराव आव्हाड, म्हातारदेव घुले, अमोल महाराज जाधव, मंदिराचे अध्यक्ष बबन घुले, अशोक दहिफळे, दत्ता जाधव सर्व विश्वस्त पदाधिकारी भक्त मंडळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत, येथे अध्यात्म व धर्माची एकजूट आहे.गेले १८ वर्षे येथे ग्रामीण भागातून आलेला ऊसतोड कामगार राहत आहे.तो आपल्या मातीशी व धर्माशी जोडला गेला आहे.आज येथील मुले उच्च पदावर गेली आहेत,आज सारसनगर परिसरातले पाहिले तर सर्व रोड काँक्रीटचे झालेले आहेत. कार्यक्रम यशश्वीतेसाठी संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठाण (ट्रस्ट) चे विश्वस्त व सदस्य यांनी प्रयत्न केले.