साखर वाटपाचा उपक्रम राज्यात एकमेव : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : दिवाळीच्या निमित्ताने मतदारसंघात साखर वाटपाचा उपक्रम हा राज्यातील एकमेव ठरला असून, प्रवरा परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकीने काम करण्याची भूमिका घेतली व वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघात सुरु असलेल्या प्रत्येक कुटूंबाला साखर वाटपाच्या उपक्रमास मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन नागरीकांना शुभेच्छा दिल्या. लोणी खुर्द, हनुमंतगाव, लोहगाव याठिकाणी साखर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, दिवाळीचे प्रकाशपर्व हे सर्वांसाठीच आनंदाचे क्षण घेऊन येत असते. मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबांच्या आनंदात या उपक्रमाने सहभागी होता आले याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने मतदारसंघात विकासकामेही सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्या पाठबळामुळे विकासाची प्रक्रीया अधिक वेगाने आपल्याला पुढे घेऊन जायची आहे.

आपले चांगले काम सुरु असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीच्या भेटीसाठी आले. पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या सहकार पंढरीला दिलेली भेट हे चांगल्या कामाचे द्योतक असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

प्रवरा परिवाराच्या माध्यमातून नेहमीच राबविले जाणारे उपक्रम हे सामाजिक बांधिलकीचे आयोजित केले जातात. पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची प्रेरणा घेऊन या भागातील विकासाची कामे सुरु आहेत.

मतदारसंघ हा एक परिवार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होणे ही कर्तव्यभावना समजुन सुरु ठेवलेले कार्य आज लोकाभिमुख ठरले आहे. शासकीय योजनांच्या लाभाबरोबरच कोव्हीड संकटात प्रवरा परिवाराने राबविलेले उपक्रम हे सर्वांनाच दिलासा देणारे ठरले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारने प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाबरोबरच ५ किलो साखर वाटपाचा उपक्रमही सर्वांसाठी आनंदाचा क्षण घेवून येणारा ठरला असल्याचे यांनी नमुद केले.