Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Supreme Court : सरकार नपुंसक आहे, म्हणून हे सगळ होतंय, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले…

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारवर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

केरळमधील पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र पोलीस न्यायालयाचा अवमान करत असल्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. काही हिंदू संघटनांनी न्यायालयाच्या निर्देशांनंतरही भावना भडकावणारी वक्तव्य केली असून त्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांना सुनावले आहे. यावर न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारला धारेवर धरत सुनावले आहे.

सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेवर पावल उचलत नाही म्हणून हे सगळं घडतंय. ज्या क्षणी धर्म आणि राजकारण वेगवेगळे होतील, त्या क्षणी हे सगळं थांबेल, अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली गेली आहे. यामुळे राज्य सरकार विरोधात विरोधकांना संधी मिळाली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर म्हटले आहे की, राज्याची निर्मिती झाल्यापासून न्यायालयाने अशाप्रकारे कोणालाही म्हटले नव्हते. हा अपमान नाही का? असा प्रश्न विचारत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता शिंदे सरकार कोंडीत सापडले आहे.