sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे.
यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या,जाऊ द्या हो, कुठं बारक्या बारक्या लेकरांचं आपण मनावर घ्यायचं. आपण त्यांच्याबद्दल एवढा गंभीर विचार करायचा नाही. लहान लेकरू आहे, बोलत असतंय. आपण त्याचं कौतुक करायचं. आपण लाडाने त्याला थोडंसं चुचकारायचं, गोंजरायचं. असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
काही लेकरांना सतत लक्ष वेधून घ्यायची सवय असते. नारायणरावांची जी बारकी बारकी लेकरं आहेत, त्यांची अडचण अशी झाली आहे की, भाजपा त्यांच्याकडे काहीही केल्याने लक्षच देत नाही. त्यामुळे इकडे आमच्या नवनीत अक्का हातपाय आपटतात.
तिकडे आमचे हे दोन भाचे हातपाय आपटतात. त्यामुळे मला वाटतंय की, या लहान लहान लेकरांवरती मी अजिबात रागवायला नको. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना बोलू द्या, असेही सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले. यामुळे मोठा गोंधळ बघायला मिळाला.