ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. योग्य निर्णय व्हावा. त्यांनी एकत्र यायलाच हवं जेणे करुन शिवसैनिकांमधील संभ्रम दूर होईल. आपण शिवसेना सोडलेली नाही. आपण शिवसैनिकच असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, कृपाल तुमाणे यांना तुम्ही शिंदे गटात जाणार का? असा सवाल केल्यानंतर नो कमेंट्स असं म्हणत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.