Ahmednagar News : राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यास रात्रीच अटक ! नेमकं काय घडलं ? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काल जिल्हा परिषद कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास फोडले गेले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रकाश पोटे यांसह पाच सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल कोतवाली पोलिसांनी पोटे यांना राहत्या घरातून अटक केली आहे.

काही गावात जलजीवन योजनेची कामे निकृष्ट झालेली असून याबाबत तक्रार करूनही जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करत नसल्याच्या रागातून पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास फोडले होते.

दरम्यान, ग्रामीण पाणी पुरवठा विभागात झालेल्या तोडफोडीचा जिल्हा परिषदेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. संबंधितांच्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने पूर्वीच कार्यवाही केलेली असून कोल्हेवाडी व हातवळण या दोन्ही ठिकाणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावचे सरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली असल्याचा खुलासा केला आहे.

पोटे यांच्या म्हणण्यानुसार ६ महिन्यांपूर्वी तालुक्यातील घोसपुरी जलजीवन योजनेचे काम सुरू करण्यात आले. यात घोसपुरी योजनेंतर्गत १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ७ नवीन टाक्यांचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालू आहे. मागील आठवड्यात पाईपलाईन पुन्हा खोदून काढली असता त्याठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाईपलाईन जमिनीत गाडली असल्याचे आढळले.

असेच निकृष्ट काम भातोडी पारगाव, कोल्हेवाडी, हातवळण येथेही झाले असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे चौकशीची मागणी केली मात्र अधिकाऱ्यांनी चालढकल केली असल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे.

तर पोटे यांच्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने पूर्वीच कार्यवाही केलेली असून कोल्हेवाडी व हातवळण या दोन्ही ठिकाणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावचे सरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तपासणी केली आहे.

ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक असल्याचा अहवालही आहे. प्रशासनाची जाणीवपूर्वक बदनामी करून अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्याचा दिसतो असे संबंधित अधिकऱ्यानी म्हटले आहे.