Maharashtra News : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. यामधून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे भरून दिले जात आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची पाण्याची वाढती मागणी, यामुळे आमदार थोरात यांनी सरकारकडे आवर्तन वाढवणे बाबत मागणी केली होती.
डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. मात्र अनेकांना पाणी मिळाले नसल्याने हे आवर्तन वाढवून मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पत्र लिहून आवर्तन वाढवणे बाबत मागणी केली.
त्यानंतर डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे. यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावी, अशी मागणीही आमदार थोरात यांनी सरकारकडे केली आहे.