Maharashtra News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत निमगावचा चेहरा मोहरा बदलला. भरीव निधी देऊन मार्गदर्शन केल्याने गावाचा विकास साध्य झाला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी विकास प्रक्रियेला भक्कम साथ देऊन सरपंच म्हणून निमगावला ग्रामविकासाचे रोल मॉडेल बनविण्याची मला संधी दिली, या संधीचे सोने करू, असा विश्वास निमगावचे सरपंच कैलास कातोरे यांनी व्यक्त केला.
मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा नुकताच सत्कार केला. याप्रसंगी सरपंच बांधवांच्या वतीने प्रातनिधिक स्वरूपात बोलताना निमगावचे युवा सरपंच कैलास कातोरे बोलत होते.
ते म्हणाले, की मंत्री विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षीय संघटनेत तसेच विविध पदांवर काम करण्याची संधी दिली.
मलाही राजकीयदृष्ट्या महत्वाच्या निमगावचा सरपंच म्हणून काम करण्याची संधक्ष दिली. मागील काळात सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे साध्य झाली. आगामी पाच वर्षांत निमगाव राज्याच्या नकाशावर आदर्श गाव म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री विखे पाटील यांनी निमगावात पाच एकर व शासकीय विश्रामगृहामागे २२ एकर असे मिळून एकूण २७ एकर जमीन ग्रामपंचायतीच्या नावे वर्ग केली आहे. या ठिकाणी शासकीय कार्यालय व इतर विकासाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलामध्ये वाढ होईल. त्याचा फायदा गावच्या विकासासाठी होईल. -कैलास कातोरे, सरपंच, निमगाव