Ahmednagar Politics : पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही.

थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिला.

यावेळी आ. थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेर मध्ये येऊन अधिकारी कर्मचाऱ्यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणाऱ्या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. धाक दपटशा आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे.

दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला. लम्पी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येतात. मात्र येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर जनता सहन करणार नाही.

निळवंडे धरणातून जेव्हा चाचणी केली गेली. त्या काळात अजून महिनाभर पाणी सुरू ठेवले असते, तर काही बिघडले नसते. आज जाणवणारी दुष्काळाची दाहकता कमी झाली असती, मात्र त्यामुळे संगमनेर, राहता आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या जीवनात आनंद निर्माण झाला असता,

तोच न बघवल्याने तातडीने पाणी बंद करण्यात आले. अजूनही वेळ गेलेली नाही, निळवंडे धरणातून तातडीने पाणी सोडा आणि जनतेला धीर द्या आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी सोडून झाल्यावर लगेच निघून जाऊ नका. ते पाणी शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचते की नाही यावरही लक्ष ठेवा.