Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची तयारी आता सुरू झालीये. त्या अनुशंघाने जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरु आहे. यासाठी आता महायुतीमधील प्रत्येक घटक एकत्रित जुळवून घेण्यासाठी आज महायुतीचा मेळावा नगरमध्ये बंधन लॉन्स मध्ये होणार आहे.
पण अहमदनगर लोकसभेची जागा विखे यांच्याकडे जाईल असे वाटत असतानाच महायुतीचेच एक घटक असणारे आ. लंके यांनी मात्र लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे नगरमधील महायुतीचा मेळावा सक्सेस होईल का? कारण या मेळाव्यास आ. लंके उपस्थित राहणार का? याची सध्या चर्चा आहे.
खासदार विखे यांनी अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मतदार संघात साखर-डाळ वाटप सुरू केले तर आमदार सके यांनीही लोकसभा मतदार संघात शिवस्वराज्य यात्रा सुरु केलीये. राणी लंके या वारंवार विखे यांचे नाव न घेता टीका करत एकप्रकारे खासदारकी लढवणारच असा चंग बांधत आहेत.
त्यामुळे एकीकडे असा बेबनाव व दुसरीकडे महायुतीचा पहिला मेळावा नगर शहरातील बंधन लॉन्स येथे होतोय. त्यामुळे यात लंके यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती सगळे काही सांगून जाणार आहे.
विखे यांनी जगताप यांच्याकडे दाखवले बोट
महायुतीच्या मेळाव्याचा पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार विखे, आमदार संग्राम जगताप आदींसह महायुतीतील घटक पक्षांचें येते आले होते. यावेळी विखे यांना एका पत्रकाराने महायुतीचे लंकेंना निमंत्रण दिले का? असे विचारले.
या प्रश्नावर विखेंनी आ. जगताप यांच्याकडे बोट दाखवत ते उत्तर देतील, असे सांगितले. आ. जगताप यांनी आ. लंके यांना निरोप दिला आहे असे संगत ते मेळाव्यासाठी येतील असा विश्वास व्यक्त केला.