“शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे ठाकरेंचंच, दम असेल तर स्वत:चा गट…”

मुंबई : भाजप सोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाणावरून” मोठा वाद सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे .त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आहे.

शिवसेना पक्ष मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच, धनुष्यबाण हे त्यांचे चिन्ह हे कायदेशीरच शिवसैनिक म्हणून बापमाणुस,दैवत मानणाऱ्या पक्षाचे नाव,चिन्ह छलकपट करून गद्दारी करून घेऊ शकत नाही. दम असेल स्वतःचा गट, कोणत्याही पक्षात जमा व्हा आणि व्हा की सिद्ध, असं ट्विट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या बाजूने लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.