राजकारण

Ahmednagar Politics : विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून तालुक्यात विकासकामांना वेग आला.

कोणत्याही विकासासाठी कामे मंजूर करून घेण्यासाठी पुरवणी बजेटमध्ये ती यावी लागतात. गेल्या वर्षी याबाबत पुरवणी बजेटमध्ये कामे दिलेली आहेत. गेल्या अडीच वर्षात कोणीतीही विकासकामे झालेली नाही.म्हणून राज्यात गेल्या १० ते १२ दिवसात राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून तालुक्यातही त्याबाबत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.

तालुक्याच्या आमदारांची झालेली घालमेल तालुक्याने पाहिली आहे. शेवटी तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी भाजपबरोबर सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांना विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

आज सोशल मीडियावर आमदारांनी ९६ कोटींचा निधी आणला याबद्दल पोस्ट वाचली. वास्तविक पहाता त्यासाठी कोणी किती पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केला. त्याबद्दल मला वाद घालायचा नाही. वादात पडायचे नाही. भविष्यात त्या संदर्भात परिपत्रक मी दाखवीन.

माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या काळात झालेल्या धरणांचे जलपूजन आमदारांनी केले. याचाही आनंद आहे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांसाठी अनेक योजना राबवित आहेत. या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात निश्चितच बदल होत आहे.

केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे. २०२४ ला पुन्हा केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येणार असून नुकतीच भारताने ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वीपणे राबवून जगात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे,

तर राज्यात देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले काम करीत असून आता त्यांच्या बरोबर ना. अजितदादा आलेले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील उर्वरित सर्व विकासकामे मार्गी लागणार आहेत. पुन्हा एकदा विकासकामासाठी आमदार भाजपबरोबर आले, त्याबद्दल स्वागत करतो, अभिनंदन करतो. असे पुन्हा पुन्हा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नमूद करीत विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असे स्पस्ट करीत आमदार यांच्यावर खोचक टीका करताना दिसून आले.

Ahmednagarlive24 Office