राजकारण

आता मंत्रिमंडळात या वाडप्यांची गरज नाही; सदाभाऊंचा सणसणीत टोला

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट आले आहे. आज शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करुन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट आले आहे. आज शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करुन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये मतदानाचा हक्क दिल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जनतेच्या हिताचे निर्णय या दोन माणसांनी घेतले. ४० मंत्री हे मंत्रिमंडळात असतात. पण आता या वाडप्यांची गरज दिसत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच चांगले निर्णय घेतले आहेत. हे या निर्णयातून समजून येत आहे. त्यामुळे ही दोन माणसं सुद्धा महाराष्ट्राला पोटभर जेवायला वाढू शकतात”, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले आणि ४० आमदारांना वाडप्यांची उपमा दिली आहे.

Ahmednagarlive24 Office