Ahmednagar Politics : ‘गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत.. मी नतमस्तक होतो..’, सोनईमधील सभेत उद्धव ठाकरे भावनिक !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलल्यानंतर व शिवसेना पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच सक्रिय झाले आहेत.

सध्या ते संपूर्ण महाराष्ट्राभर दौरे करत आहेत. नुकताच त्यांचा कोकण दौरा पार पडला. आज (दि.१३ फेब्रुवारी) ते अहमदनगर जिल्ह्यात सोनई याठिकाणी संवाद मेळाव्यासाठी आले होते.

यावेळी भव्य गर्दी जमली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक करत स्तुतीसुमने उधळली. तर यावेळी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

आ.गडाख यांचे कौतुक

सोनई मधील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आ. शंकरराव गडाख व सर्व शिवसैनिकांचे कौतुक केले. ते म्हणाले, सोनईमधले सोन्यासारखे माझे मर्द मावळे आहेत, त्यांचे, त्यांच्या प्रामाणिकपणाचे मी काय वर्णन करू, ज्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह देखील नाही तरीही तुम्ही आमच्यावर प्रेम करत आहात,

हे पाहून मी नतमस्तक होतो.. आता सध्याला माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. शिवसेनेची व गडाख अशी जवळीक याआधी नव्हती पण ते 2019 मध्ये अपक्ष निवडून आले व महाविकास आघाडीत त्यांना आपण मंत्रिपद दिले.

आज ते इतरांसारखे तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद तेथे मिळले असते पण गडाख यांनी निष्ठा ठेवली व ते आमच्याजवळच राहिले. गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत असे ते यावेळी म्हणाले.

मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी सध्या भाजपची स्थिती

अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली. जे कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते ते अचानक भाजपसोबत गेले असून सध्या जे घाबरले आहेत ते भाजपसोबत जात आहेत व भाजप देखील घाबरलेले आहे असे ठाकरे म्हणाले.

मोदी आणि फडणवीस यांच्या जुन्या क्लिप असून आदर्शमधील डीलर असा उल्लेख अशोक चव्हाण यांचा त्यांनी केला आहे. आज त्यांनाच भाजपने सोबत घेतले असून मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी सध्या भाजपची स्थिती झाली आहे असे ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना काडीची मदत नाही पण गद्दारांना खोके मिळतात

शेतकऱ्यांच्या सद्यस्थिती बाबतही उद्धव ठाकरे यांनी वाच्यता केली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बरोबर नसून त्यांना विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे.

परंतु इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही परंतु गद्दारी करणाऱ्यांना खोके मिळतात असा घणाघात त्यांनी आज केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe