तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. मात्र सेना-भाजप न करता आपणच असंघाशी संग करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत उभद्र आघाडी केली. आम्ही कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे लाज वाटण्याचा संबंध येत नाही, असे भरत गोगावले म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही सोडणार नाही, असेही भरत गोगावले म्हणाले आहेत. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. बंड केल्यामुळे आमदारांवर ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात येत आहे.