Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचायला लागला आहे. लवकरच आता भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अर्ज भरतील.
दरम्यान आता निलेश लंके यांनी गावोगावी जात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्काचा सपाटा लावला आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे बोलताना निलेश लंके यांनी विरोधी उमेदवारावर घणाघात केला. पाच वर्षात तुम्हाला दिलेल्या संधीचे सोने करायला पाहिजे होते, परंतु त्याऐवजी लोकांना झुलवत ठेवण्याचे काम केले.
सत्तेच्या माध्यमातून तुम्ही काय विकास केला हे सांगा, असे आव्हान नीलेश लंके यांनी केले. तसेच ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. आता त्यांचे काहीही चालणार नाही. उत्तरेतील यंत्रणाही मी मॅनेज केली आहे.
ते माझ्या संपर्कात असून त्यांच्या सगळ्या खबरा माझ्यापर्यंत पोहोच करतात त्यामुळे ही निवडणूक त्यांना अवघड असल्याचा धक्कादायक खुलासा लंके यांनी केला.
काय म्हणाले निलेश लंके
सत्तेच्या माध्यमातून तुम्ही काय विकास केला हे सांगा. इंग्रजी बोलणारा नव्हे, तर काम करणारा खासदार हवा हे त्यांना लोक सांगत आहेत, असे लंके म्हणाले. त्यांनी पाच वर्षांत काय कामे केली हे जनतेपुढे मांडण्याची गरज आहे,
परंतु त्यांनी कुठलेही भरीव कामच न केल्याने ते काय सांगणार हा प्रश्न आहे, जर काहीच केले नाही, तर तुम्ही कशावर मते मागताय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा सल्लाही लंके यांनी दिला. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.
आता त्यांचे काहीही चालणार नाही. उत्तरेतील यंत्रणाही मी मॅनेज केली आहे. ते माझ्या संपर्कात असून त्यांच्या सगळ्या खबरा माझ्यापर्यंत पोहोच करतात त्यामुळे ही निवडणूक त्यांना अवघड असल्याचा धक्कादायक खुलासा लंके यांनी केला.
पाण्याचा मुद्दा गाजणार
यावेळी देखील श्रीगोंद्यातील पाणी प्रश्न गाजणार असे चित्र आहे. याचे कारण असे की लंके यांनी या प्रश्नाला हात घालत पत्रकारांशी संवाद साधला. लंके म्हणाले, मतदारसंघातील पाणीप्रश्न, बेरोजगारी बिकट आहे. खासदारांनी याप्रश्नी लक्षच घातले नाही. आपण हे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.