त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले पुन्हा विधानसभेत जाणार नाहीत हे लोकांनी ठरवले आहे. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचे असून शिवसेनेकडेच राहणार आहे. भाजपने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं हे महाराष्ट्र जाणतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.