राजकारण

Maharashtra Politics : या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : राज्यातील सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही. ना मराठा समाजाला, ना धनगर समाजाला, हे खोके सरकार नागरिकांना झुलवत ठेवणारे सरकार आहे. या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केली.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊन जाऊदे चर्चा’ या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाप्रमुख दळवी बोलत होते.

दळवी म्हणाले, हे सरकार खोटी आश्वासने देऊन वेळकाढूपणा करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले. मात्र, अनेक नियम लावले, शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

सध्याचे सरकार हे फसवे शेतकरीविरोधी सरकार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीला समर्थपणे तोंड दिले. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली.

परदेश दौरा करून तेथील उद्योग महाराष्ट्रात आणले. मात्र, या आताच्या सरकारने हेच सर्व उद्योग गुजरातला नेऊन ठेवले आहे. सध्याचे सरकार खाजगीकरण करून आपला खिसा भरत आहे.

तालुकाप्रमुख भगवान दराडे म्हणाले, सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव तर सोडा, कांदा, टोमॅटोचे भाव थोडे वाढले तरी इतरदेशांकडून आयात करून देशातील शेतकऱ्यांना खड्डयात घातले. शेतीमालाला कवडी मोलाने विक्री करायला लावणारे हे सरकार आहे. प्रास्ताविक दत्तात्रय कोरडे यांनी केले. आभार युवानेते राज कराळे यांनी मानले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख, रफिक भैय्या शेख, रावजी नांगरे, माजी जि.प. सदस्या उषाताई अनिलराव कराळे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे, पाथर्डी शहरप्रमुख भाऊसाहेब धस, शिवसेना नेते एकनाथ झाडे, उध्दव दुसंग, दत्तु कोरडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख भागिनाथ गवळी, रामकिसन भिसे, भाऊसाहेब निमसे, केशव खेडकर, किशोर गाडेकर, सुरेश बर्फे, शरद गवळी, आप्पा नवघरे, बाळासाहेब घुले,

आदिनाथ शेळके, सुनिल निंबाळकर, कानिफ जगताप, सुनिल कराळे, शिवाजी म्हस्के, गौतम कराळे, बाळासाहेब कराळे, आदिनाथ ढवळे, शिवाजी कराळे, मयुर तागड, आदिनाथ सोलाट, संजय शिंदे, भाऊसाहेब काळे, गणेश ढेरे, गोविंद कराळे, रंगनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, भाऊसाहेब निमसे, बाळासाहेब निकाळजे, साईनाथ कोरडे, बाबुराव जमदाडे, डॉ. श्याम कोरडे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office