Maharashtra News : देशातील व राज्यातील केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच स्तरावर प्रगतीच्या मार्गावर असून,
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन वेळेस दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन देशातील कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी केली.
अखेर त्यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले असून, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवलाने शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला असून, या निर्णयाचे भाजपासह शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात अल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कर्डिले यांची भेट घेऊन राज्य व केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.
या वेळी अक्षय कर्डिले म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी खऱ्या अर्थाने केली.
त्यानंतर दोनच दिवसात संपूर्ण देशातील कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली. राज्यातील व देशातील सरकार नेहमी शेतकरी हिताचेच निर्णय घेत असून, शेतकऱ्यांना हे सरकार कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.
केंद्र व राज्य सरकारच्या एकोप्याने शेतकऱ्यांच्या मासिक मानधनातदेखील वाढ करण्यात आली असल्याचे अक्षय कर्डिले यांनी सागितले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांमधून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.