Ahmednagar Politics : यंदाचे वर्ष गद्दारांना निवडणूकीत संपविण्याचे ! शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : शिवसेनेने सर्व काही दिले होते. त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली. अशा गद्दारी करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपविण्याचे हे वर्ष असल्याचे आवाहन शिवसेनेचे निगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले. कोपरगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खेवरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सगळ्यात पावरफुल कोपरगावची शिवसेना आहे. येथील एकही शिवसैनिक शिंदे गटाच्या गळाला लागला नाही. हा कट्टर शिवसैनिकांचा तालुका आहे. मातोश्री बाहेर आदित्य ठाकरे यांची तासंतास वाट पाहणाऱ्यांनी चुकीचा व अन्यायी निर्णय दिल्याची टीका खेवरे यांनी यावेळी केली.

याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, कोपरगावचा पाणी प्रश्न आजही सतावतो आहे. आपण ४७ कोटी रुपये दिले होते. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिन्यातील काही दिवस कोपरगाव शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला देणार असल्याची ग्वाही वाकचौरे यांनी यावेळी दिली.

यावेळी नितीन औताडे म्हणाले, शाखा या तेथील लोकांच्या अडचणी सोडवण्याचे माध्यम आहे. सामान्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने दखल घेण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, शिर्डी मतदान संघ प्रचार प्रमुख सुहास वहाडणे, शहर उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, ग्रामीण उपजिल्हा प्रमुख श्रीरंग चांदगुडे, तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शहरप्रमुख सनी वाघ,

शहर संघटक कलविंदर दडियाल, इरफान शेख, रवि कथले, बालाजी गोर्डे, मुकुंद सिनगर, माजी सरपंच संजय गुरसळ, मनोज कपोते, शहर समन्वयक कालुआप्पा आव्हाड,

अभिषेक आव्हाड, प्रविण शिंदे, प्रफुल्ल शिंगाडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी श्रीरंग चांदगुडे, कलविंदर दडियाल, मुकुंद सिनगर, सुहास वहाडणे, कैलास जाधव, राजेंद्र झावरे यांनी मनोगत व्यक्त केली.

तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण जावळे यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय दंडवते यांनी आभार मानले.