राजकारण

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

Published by
Sushant Kulkarni

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावरून महाविकास आघाडीत असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

दोघांमध्ये यावेळी दीड तास चर्चा झाली.राजकीय वर्तुळात त्यामुळे उलटसुलट चर्चाना ऊत आला आहे.दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आमदार रोहित पवार,माजी कर्णधार सुनील गावसकर, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे) दारुण पराभव झाला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.शिवसेनेने (ठाकरे) स्वबळाची ताकद दाखवून देण्यासाठी दंड थोपटले आहेत.सेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते.

Sushant Kulkarni