राजकारण

Uddhav thackeray : ठाकरे सरकार कोसळण्याचे सर्वात मोठं कारण नाना पटोले! आता शिवसेनेचा खळबळजनक आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

Uddhav thackeray : सध्या काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करत बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे पटोले यांच्यावर आता अनेकजण आरोप करत आहेत. आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष देखील पटोले यांच्यावर आरोप करत आहेत.

आता शिवसेना ठाकरे गटाने धक्कादायक आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागे इतर अनेक कारणं असली तरीही सर्वात मोठं कारण नाना पटोले आहेत, असे सामनातून म्हटले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

याआधी देखील खासदार संजय राऊत यांनी या वादावर भाष्य केले होते. तसेच पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयता लोण्याचा गोळा पडू शकतो, असेही म्हटले आहे.

थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वादळात त्यांनी काँग्रेसला धरून ठेवले. पण नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानीत केले, थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान राखायचा नाही तर कुणाचा राखायचा, असेही म्हटले आहे.

दरम्यान, पटोले यांचा राजीनामा हा शहाणपाणाचा निर्णय नव्हता, तिथूनच संकटांची मालिका सुरु झाली. अध्यक्षपदी पटोले असते तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेले अनेक पेच टाळता आले असते. पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही, असेही सामनातून म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office