राजकारण

Ahmednagar Politics : विखे पाटील पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला ! आजोबांपासून ते नातवापर्यंत सारच काढलं

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय नेते मंडळी आता जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत.

राजकीय नेते आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून टाकायला बाहेर पडली आहेत. दरम्यान उबाठा शिवसेना गटाने देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.

दरम्यान याच यात्रेच्या निमित्ताने उबाठा शिवसेना गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभेचा त्यांनी आत्तापर्यंत दौरा केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे.

दरम्यान काल अर्थातच 13 फेब्रुवारी 2024 रोजी उद्धव ठाकरे वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात आले होते. पाटील यांच्या मतदारसंघातील राहता शहरात काल उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी देखील केली. उद्धव ठाकरे यांनी विखे पिता-पुत्रांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यांनी यावेळी आजोबांपासून ते नातवापर्यंत अर्थातच विखे यांच्या वडिलांपासून ते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापर्यंत सार काही काढलं आहे.

विखे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी “विखें यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केले. पण, तेही ते विसरले.” पुढे ठाकरे यांनी जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय. पण, आता कुठे जाणार ? असा घणाघाती हल्ला केला आहे.

तसेच उपस्थित जनतेला संबोधित करताना ठाकरे यांनी तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यावर त्यांच्या म्हणजेच विखे पिता-पुत्र यांच्या सगळ्याच भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

शिवाय उद्धव ठाकरे यांनी “सध्या तुम्ही उतमात करत आहे. तुम्हाला वाटत असेल कोणी विचारणार नाही. पण, असं नसतं. सगळे दिवस सारखे नसतात. दिवस बदलतात. आज तुम्हाला वाटतं की तुमचे दिवस आहे. मात्र, उद्याचा दिवस हा आमचा आहे,” अशा शब्दांत विखे पिता-पुत्र यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

याशिवाय काल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर देखील टिका केली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर विखे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office