राजकारण

Ahmednagar Politics : विखे-कर्डिलेंची जोडगोळी सुसाट ! लाखोंची विकासकामे, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर ”दिवाळी’चे नियोजन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोष्टींना जोर आला आहे. खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विकासकामांचा तडाखाच लावला आहे.

खा. सुजय विखे यांनी माजी आ. कर्डीले, आ. जगताप यांनाही सोबत घेत आपली ‘सहमती’ एक्स्प्रेस सुसाट चालवलेली आहे. लाखोंची विकासकामे, कामांचे लोकार्पण सुरु आहेत.

राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा व दिवाळीचे नियोजन

अयोध्येत २२ जानेवारीला राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे व त्याच पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने त्यांनी सध्या साखर आणि डाळीचे वाटप स्वतः खा. सुजय विखे करत आहेत.

जनतेने या डाळींचे लाडू करावेत, स्वतः खावेत व प्रसाद म्हणून यातील लाडू वाटावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. राममूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला गोड दिवाळी साजरी करण्याचा

आनंद मिळावा तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास न जाता येथेच आपल्या घरीच राहून आनंद घेता यावा या उद्देशाने साखर व डाळ वाटप करत असल्याचे खा. विखे यांनी स्पष्ट केले.

विकासकामे व लोकार्पण

सध्या विविध विकासकामे करण्यावर देखील भर आहे. मतदार संघात त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. हे करताना मात्र ते कर्डीले-जगताप यांना सोबत घ्यायला मात्र विसरत नाहीत. नुक्तेचक त्यांनी करंजी (ता. पाथडों) येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पूर्ण केला.

यावेळी ते म्हणाले, मेहेकरी ते फुंदे टाकळीपर्यंत रखडलेल्या २२२ या राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करणार नाही, तोपर्यंत करंजी गावात कार्यक्रम घेणार नाही, असा पण मी स्वतःसाठीच केला होता. तो पण मी पूर्ण केला आहेच.

शिवाय उर्वरित रस्त्यासाठीही १७ कोटी रुपये नव्याने मंजूर केले असल्याने त्यांनी सांगितले. तसेच काही लोकप्रतिनिधी गावात नेहमी ये-जा करत असतात. मात्र, ते गावासाठी काहीही योगदान देत नाहीत, अशा लोकप्रतिनिधींना लोकांनी ओळखले आहे.

आम्ही विकासाचे काम करतो, त्यामुळे आपण गावाच्या विकासाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहावे, असेही सुजय विखे यावेळी म्हणाले. तसेच माजी आ. शिवाजी कर्डीले यांनी यावेळी सांगितले की,

या भागातील महत्त्वाचा प्रश्न असलेल्या वांबोरी चारी टप्पा दोनची निविदा येत्या पंधरा दिवसांत निघणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून, त्यासंबंधी लवकरच कार्यक्रम घेणार आहोत.

गेल्या तीन वर्षांत भाजपचे सरकार नसल्यामुळे अनेक विकासकामे थंडावली होती. आता भाजपचे सरकार असल्यामुळे विकासकामांना गती मिळाली असल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office