राजकारण

Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले जायकवाडी पाणी प्रश्नाकडे…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये झालेला ठराव सर्वपक्षीय आमदारांनी मिळून केलेला आहे. यामध्ये मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात कुठलीही टोकाची भूमिका नाही.

या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून आणि कायद्याकडे बोट दाखवून निर्णय करण्यापेक्षा संकटातून कसा मार्ग निघेल, याचा सर्वकंश विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जायकवाडी धरणातील पाण्याचा साठा पाहिला तर आज पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

उलट नगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. पाऊसच यंदा झाला नसल्याने पाण्याची गरज नगर जिल्-ह्यालाही मोठी आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील नेत्यांनीसुध्दा समन्वयाची भूमिका दाखवावी, हाच आमचा उद्देश आहे. त्यांच्या अधिकारांवर आम्ही अतिक्रमण करतोय, ही भूमिका आमची कधीच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नासंदर्भात आमदार बंब यांच्याशी मी व्यतिगत बोलणार आहे. पाण्याच्या समस्येवर राजकीय भाष्य किंवा कायद्याकडे बोट दाखवून हा प्रश्न सुटणार नाही. या संकटातून मार्ग कसा काढायचा, यासाठी सर्वंकश विचार करण्याची आज आवश्यकता आहे.

आ. बंब यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेले विधानही अत्यंत चुकीचे आहे. आत्महत्येला कोणीही प्रवृत्त करीत नसतो. आज वरच्या भागातही पाणी नाही. येथील शेतकरी हालाखीच्या परिस्थितीत आहेत, याचाही विचार करणे आवश्यक असल- याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Ahmednagarlive24 Office