राजकारण

Voter Id Rule: मतदान करण्याची वेळ आली परंतु मतदार कार्ड हरवले तर अशा वेळेस काय कराल? कोणती कागदपत्रे लागतील? वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Voter Id Rule:- निवडणुकांचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तारखा काल निवडणूक आयोगाने जाहीर केल्या व त्यानुसार आता देशात सात टप्प्यात निवडणुकांचा हा कार्यक्रम पार पाडणार असून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात हे मतदान होणार आहे.

यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा हा एक जून रोजी असून 4 जून रोजी संपूर्ण देशातील मतमोजणी होणार आहे व त्याच दिवशी निकाल लागणार आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर संपूर्ण देशामध्ये कालपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

काल निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक नियम सांगण्यात आले. या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की आपल्याला जर मतदानाचा हक्क पार पाडायचा असेल तर त्याकरता मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी असणे गरजेचे आहे.

परंतु देशांमध्ये अजून पर्यंत असे बरेच लोक आहेत की त्यांच्याकडे वोटर आयडी नाही. परंतु मतदान यादीमध्ये नाव आहे. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याकडे वोटर आयडी म्हणजेच मतदार कार्ड नसल्यामुळे आपण मतदान करू शकतो का किंवा करू शकू का? त्यामुळे या लेखात आपण मतदार ओळखपत्र हरवले असेल किंवा नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायला हवे किंवा त्याऐवजी तुम्हाला कुठले कागदपत्रांच्या आधारे मतदानाचा हक्क बजावता येईल? याबाबतची माहिती घेणार आहोत.

 वोटर आयडी नसेल तर आधी काय कराल?

याकरिता तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे का? हे बघणे खूप गरजेचे आहे. कारण तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तुमचे नाव रजिस्टर नसेल तर फॉर्म 6 भरून तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे हा फॉर्म जमा करणे गरजेचे आहे व त्यानंतर तुमचे नाव मतदार यादी मध्ये रजिस्टर केले जाते. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करू शकतात.

 मतदार कार्ड म्हणजेच वोटर आयडी नसेल तर कुठली कागदपत्रे आवश्यक असतात?

समजा तुम्ही मतदानाला जात आहात आणि तुमचे मतदार ओळखपत्र हरवले किंवा तुमच्याकडे नाही तर अशावेळी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली 11 फोटो आयडी कागदपत्रांपैकी एक कुठलीही कागदपत्र असणे गरजेचे आहे.

या कागदपत्रांमध्ये तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच केंद्र- राज्य सरकार, पीएसयु किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीने जारी केलेला फोटो असलेले आय कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने.जारी केलेले आणि त्यावर फोटो असलेले पासबुक, पॅन कार्ड,

एनपीआरद्वारे आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड तसेच केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जारी केलेल्या आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, तुमचे फोटो असलेले पेन्शन डॉक्युमेंट, खासदार- आमदारांसाठी जारी केलेल्या अधिकृत आय कार्ड,

आधार कार्ड यापैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार यादीमध्ये नाव असणे खूप गरजेचे आहे.

जर तुमचे नाव मतदार यादीमध्ये असेल तर वोटर आयडी नसेल तरी तुम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या 11 ओळखपत्रंपैकी एक ओळखपत्र दिल्यास तुम्हाला मतदान करता येऊ शकते.

Ajay Patil