राजकारण

Ahmednagar politics : दोनदा भेटले मग चर्चा नेमकी कशाची केली? कांदा प्रश्नावरून आ. राम शिंदेंनी खा. विखेंविषयी व्यक्त केली ‘ही’ शंका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar politics : सध्या कांदा निर्यात बंदी वरून जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठविल्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

खा. सुजय विखे यांनी एकदा व त्यानंतर विखे पितापुत्र यांनी एकदा अशा दोन भेटी कांदा प्रश्नी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतली होती.

कांदा उत्पादकांच्या अर्थव्यवस्थेला झळाळी देणार्‍या निर्णयाचे जिल्हाभरात भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र कांदा निर्यात बंदी उठली की नाही?

आठ दिवसांत दोनदा चचर्चा झाली, भेटीत तुम्ही नेमकी कोणत्या प्रश्नाबाबत चर्चा केली, असा टोला आमदार प्रा.राम शिंदे यांनी खा. सुजय विखे यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

आमदार प्रा राम शिंदे नेमकं काय म्हणाले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या प्रश्नाबाबत चर्चा केली, असा कोणता प्रश्न होता की त्यावर आठ दिवसांत दोनदा चर्चा करण्यात आली.

कांदा निर्यातबंदी उठवण्यावर चर्चा झाली की नाही, याबाबत शंका आहे. आमदार रोहित पवारांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो, असे त्यांनी सांगितले होते.

मग त्यांनी तो दावा दाखल केला का? असे खोचक सवाल भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी खा. विखे यांचे नाव न घेता केला आहे.

राजकारणासाठी कांदाप्रश्नी संभ्रम
कांदा निर्यात बंदी बाबत केवळ राजकारण करण्यासाठी हा संभ्रम निर्माण केला जात आहे, त्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे जाहीर देखील करण्यात आले होते.

कांदा निर्यात उठवण्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबत केंद्रीय समिती अधिसूचना जारी करणार आहे. कांदा निर्यात बंदी बाबत दोन वेगवेगळे विषय आहेत.

कांदा निर्यात होणारच आहे. केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत भारताचे मित्र देश असलेल्या बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका,

भूतान या देशांकडून कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Ahmednagarlive24 Office