राजकारण

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधी ? निवडणूक आयोगाची तातडीची पत्रकार परिषद, केली मोठी घोषणा

Published by
Ahmednagarlive24 Office

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या.

जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरपासून तर तर, हरियाणा येथे १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्पे असतील. महाराष्ट्रात मात्र तूर्तास निवडणुका होणार नाहीत.

महाराष्ट्रात का नाहीत निवडणुका?
महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे महत्वाचे कारण यावेळी आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानतंर प्रथमच निवडणुका पार पडतायेत.

तेथे सध्या मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा त्याठिकाणी पुरवावी लागणार आहे. त्यामुळे या काळात महाराष्ट्रात निवडणुका होणार नसल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या महायुती व महाविकास आघाडी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागली होती. आधी जागावाटप व नंतर उमेदवार निश्चिती असे काहीसे होणार होते परंतु आता निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

जम्मू काश्मीर व हरियाणात कशी असेल प्रक्रिया 
जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरला पहिला टप्पा, २५ सप्टेंबरला दुसरा टप्पा, १ ऑक्टोबरला तिसरा टप्पा मतदानाचा पार पडेल.

त्यानंतर ४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७.९ लाख मतदार असून ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हरियाणात १ ऑक्टोबरला मतदान पार पडेल व ४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. हरियाणात २ कोटींहून अधिक मतदार असून ते आपला हक्क बजावतील.

 

Ahmednagarlive24 Office