Ahmadnagar Loksabha Election : महायुतीकडून तिकीट कोणाला मिळणार ? राणी लंकेच्या घोषणेने खासदार सुजय विखे अस्वस्थ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी आता पाहायला मिळत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठे राजकारण सुरु आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अहमदनगर जिल्ह्यात आपली पकड मजबूत व्हावी यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

खरे तर राष्ट्रवादीमध्ये विद्रोह होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे फूट पडण्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात तब्बल सहा आमदार होते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर चार आमदार अजित दादांकडे गेलेत म्हणजे शरद पवारांकडे फक्त दोन आमदार शिल्लक आहेत.

त्यामुळे शरद पवार गटाने अहमदनगर जिल्ह्यात नव्याने मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली आहे. यासाठी कालपासून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साईनगरी शिर्डी मध्ये शिबिर सुरू झाले आहे. अशातच आता महायुतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या एका जागेसाठी शीतयुद्ध सुरू होणार असे चित्र तयार होत आहे.

कारण की, अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. राणी लंके यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यामुळे नगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांचा गट अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात असून महायुतीने अर्थातच एकनाथ शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित आगामी लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचे जाहीर केले आहे.

मात्र असतानाही आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनींने खासदार सुजय विखे यांच्या विरोधात जाऊन नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे लंके यांच्या समर्थकांमध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर राणी लंके यांनी आतापासूनच तयारी देखील सुरू केली आहे. राणी लंके यांनी मोहटादेवीचे दर्शन घेत नगर दक्षिण मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेला सुरवात देखील केली आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी राणी लंके यांनी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.

यश म्हणजे स्वतः लंके यांनी ही यात्रा लोकसभा निवडणुकीचाच एक भाग असल्याचे म्हटले आहे. अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून यामुळे भाजपा सहित सुजय विखे पाटील गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. यामुळे महायुतीत सारे काही आलबेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राणी लंके यांनी समोर कोणीही असू द्या आपण विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार ऐन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचं केला असल्याने आता भारतीय जनता पार्टीकडून विखे पाटलांना डावलून महायुतीकडून राणी लंके यांना तिकीट देणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.